Loading...

मराठी चित्रपटसृष्टी पारतंत्र्यात असल्याचा दावा!

मुंबई | सरकारला जाग कधी येणार? भारताच्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय, असं म्हणत अभिनेता प्रसाद ओक याने आपली खंत बोलून दाखवली आहे. ‘ये रे ये रे पैसा 2’ या चित्रपटाला थिएटर्स मिळत नसल्याने प्रसाद ओक सरकारवर चांगलाच भडकल्याचं पहायला मिळतंय.

अमेय खोपकर निर्मित ‘ये रे ये रे पैसा 2’ हा चित्रपट मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाला. मात्र आता या आठवड्यात 2 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाला थिएटर्स मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. अमेय खोपकर गेली 12 वर्षे मराठी चित्रपटांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडत आहेत. त्यांच्याच चित्रपटाची अशी अवस्था असेल सरकारला जाग कधी येणार?, असा प्रश्न प्रसादने उपस्थित केला आहे.

Loading...

स्वत:च्या चित्रपटासाठी भांडणं अमेय खोपकर यांच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी मिळून मराठी चित्रपटांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, असं प्रसादने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘ये रे ये रे पैसा 2’चा दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यानेही यासंदर्भात फेसबुक लाईव्ह करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सगळ्यांनी एकत्र येत मराठी चित्रपटांना मोठं करूयात, असं आवाहनही त्याने या लाईव्हमध्ये केलं आहे.

Loading...

अभिनेता प्रसाद ओकची फेसबुक पोस्ट-

 

अभिनेता हेमंत ढोमे याचं फेसबुक लाईव्ह-

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-संकट खूप मोठं आहे… शर्मिला ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

काश्मिर भारताचा अविभाज्य भाग… उगीचच नाक खूपसू नका; अदनान सामीने टीकाकारांना सुनावले

-सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार; मिका सिंगचं पूरग्रस्तांना आश्वासन

-शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण

-पूरग्रस्तांची मदत करुन लांडगे परिवाराने जपला पन्नास वर्षांचा ऋणानुबंध

Loading...