बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

मुंबई | मराठी सिनेमांकडे फार कमी लोक वळताना दिसत आहेत. लोक हिंदी सिनेमांना जास्त प्राधान्य देतात. तसेच मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र याला मराठी प्रेक्षकच जबाबदार असल्याचं अभिनेता प्रसाद ओकने म्हटलंय.

अभिनेता प्रसाद ओकने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटांच्या परिस्थितीवर भाष्य केलंय. मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार असल्याचं प्रसाद ओकने म्हटलंय. तसेच महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी भीक मागावी लागतेय अशी वेळ येईल असा विचारही केला नव्हता, असं त्याने म्हटलंय.

मराठी चित्रपट चालत नाही अशी ओरड करण्याआधी मराठी माणसानेच आधी विचार करण्याची गरज आहे. मराठी माणसंचं हिंदीला आधी प्राधान्य देतात. जर महिन्यात तुम्ही एक चित्रपट पाहत असाल तर पहिला विचार मराठी चित्रपटाचा का होत नाही? मग मराठी चित्रपटांना सिनेमागृह मिळत नाही किंवा ते चालत नाही याचा आरडाओरड करण्याला अर्थ नाही, असं प्रसाद ओकने म्हटलंय.

प्रत्येक मराठी सिनेमा उत्तम बनत नाही हे मी प्रमाणिकपणे नमूद करतो. मात्र हे हिंदीतही आहे. हिंदीतही प्रत्येक सिनेमा उत्तम बनत नाहीत. तिथेही वाईट सिनेमा असतात. मात्र त्यात मोठी स्टार कास्ट असते, ग्लॅमर असतं, पैसा खर्च केलेला असतो, परदेशात शूटिंग केलेलं असतं त्यामुळे लोकांना त्याच आकर्षण असतं म्हणून ते पाहायला जातात. मात्र त्यावेळेला तुमचं साहित्यावरचं प्रेम कुठे जातं? जयवंत दळवी, बालगंधर्वांवरचं प्रेम कुठे जातं?, असा सवाल प्रसाद ओकने केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

कोरोना काळात ‘गरिबांचा मसीहा’ बनलेल्या सोनू सूदलाही कोरोनाची लागण

“कोरोनाची दुसरी लाट जितक्या वेगानं आली, तितक्याच वेगानं जाणार”

काळजाचा ठोका चुकवणारी घटना; मांत्रिकाकडे जाऊन उपचार घेणं कोरोनाबाधित महिलेच्या जीवावर बेतलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More