बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

पुणे | डोक्यात गोळी झाडून भाजप नगरसेविकेच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवडे नगर, चिंचवड येथे रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे, असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे.

प्रसन्न याने कुटुंबियांसमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं.

प्रसन्नला थेरगावयेथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच प्रसन्नचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलातून त्याने गोळी झाडून घेतली आहे.

दरम्यान, प्रसन्नने गोळी झाडून का घेतली तसेच त्याने का आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

सावधान!!! महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; आज तब्बल एवढ्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरारक सामना, असा झाला भारताचा विजय!

ठोकर खाके आदमी ठाकूर बनता है!; मराठमोळ्या शार्दुलचं विरुकडून कौतुक

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पैसे खात नाही असा अधिकारी-कर्मचारी पोलीस दलात नाही- निवृत्त IPS मीरा बोरवणकर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More