…आणि मुख्यमंत्र्यांच्या भावाला कोटाही पूर्ण करता आला नाही!

विजयी उमेदवार अभिषेक बोके

पुणे | पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांची चांगलीच दमछाक झाली. त्यांना मतांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. 

सिनेटमध्ये पदवीधर खुल्या गटासाठी 5 जागा होत्या. पैकी संतोष ढोरे आणि अनिल विखे-पाटील सोबत विजयी झाले त्यानंतर तानाजी वाघ आणि अभिषेक बोके यांनी विजय मिळवला. त्यामुळे शेवटच्या जागेवर तरी प्रसेनजीत निवडून येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर त्यांनी मतांचा कोटा पूर्ण केला नसतानाही इतर उमेदवारांना कमी मते असल्याने पाचव्या जागेवर त्यांची वर्णी लागली. 

पुणे विद्यापीठ सिनेट विजयी उमेदवार-

पदवीधर खुला गट –

 1. संतोष ढोरे
 2. अनिल विखे-पाटील
 3. तानाजी वाघ
 4. अभिषेक बोके
 5. प्रसेनजीत फडणवीस

पदवीधर राखीव गट –

 1. दादासाहेब शिनलकर – ओबीसी
 2. बागेश्री मंठाळकर – महिला राखीव
 3. विश्वनाथ पाडवी – ST राखीव
 4. शशिकांत तिकोटे – SC राखीव
 5. विजय सोनावणे – NT राखीव

व्यवस्थापन प्रतिनिधी-

 1. सुनेत्रा पवार – बिनविरोध
 2. सोमनाथ पाटील
 3. श्यामकांत देशमुख
 4. संदीप कदम
 5. राजेंद्र विखे-पाटील