रायगड | रायगडमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकाऱ्यानेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
प्रशांत काणेरकर यांची तीन महिन्यापूर्वींच अलिबाग येथे नियुक्ती झाली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर जिल्हा पोलीस दल हादरून गेलं आहे. प्रशांत यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वीच मुंबईहून अलिबागला रूजू झाले होते. यानंतर ते काही दिवस रजेवर गेले होते. मात्र पुन्हा कामावर रूजू झाल्यानंतर त्यांनी 16 ऑगस्टला रात्री 8 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तसाप करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड अन् सोशल मीडियावर गदारोळ; फॅन्स म्हणतात…
-काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या ‘त्या’ आमदाराने घेतली 11 कोटींची कार!
-‘ही’ अभिनेत्री उचलणार पूरग्रस्त भागातील 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी
-कौतुकास्पद! गावातील तरूणांनी शहिदाच्या पत्नीला नवं घर दिलं बांधून
-पूरग्रस्तांना गायी, म्हशी आणि बैलजोड्या द्या; महेश लांडगेंचं गणेश मंडळांना आवाहन
Comments are closed.