बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या अचानक भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. पण त्यानंतर देखील 10 दिवसात या दोघांमध्ये पुन्हा भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यात आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.

प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या दोघांमध्ये एक बैठक झाली असून त्या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. पंजाबमध्ये सुरु असलेला काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि 2024 सालची लोकसभा निवडणूक या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर येत आहे. नवज्योतसिंह सिद्धू विरोध कॅप्टन अमरिंदर सिंह असे दोन गट पडले होते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांची सल्लागारपदी नियुक्ती केली होती. प्रशांत किशोर यांच्याकडे हा वाद मिटवण्याचं काम दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

दरम्यान, 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यावर आगामी राष्ट्रपती निवडणूकीवर देखील चर्चा झाल्याची  माहिती समोर आली आहे. या निवडणूकीसाठी शरद पवारांच्या नाव पुढं येऊ शकतं. तर दुसरीकडे बीजेडी नेते नवीन पटनायक आणि एम के स्टाॅलिन यांचं नाव देखील चर्चेत आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाजुद्दिन सिद्दीकीचा फोटो शेअर करत कंगना म्हणाली ‘मला वाघ मिळालाय’

“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत”

“एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न”

“भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय”

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More