बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रशांत किशोर यांनी दिला मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा!

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बैठकीचा धडाका लावला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि विरोधीपक्षातील अनेक नेत्यांच्या भेटागाठी घेतल्या होत्या. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकिय चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी पंजाब काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

येत्या काही काळात पंजाब विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्यानं मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी एक पत्र पाठवून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सार्वजनिक आयुष्यापासून काही काळ दूर राहण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मुख्य सल्लागार पदाची कामं करण्यासाठी मी सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील वाटचालींबद्दलही निर्णय घ्यायचा असून, मी आपल्याला विनंती करतो की, मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती प्रशांत किशोर यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केली आहे.

दरम्यान, आगामी काळात प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहेत, तर येत्या काळात नवज्योत सिंग सिद्दू यांच्याकडे पंजाब काँग्रेसच्या निवडणुकीची जबाबदारी दिली जाऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांकडून अमित शहांना खास निमंत्रण; लवकरच अमित शहांचा पुणे दौरा

अबब! प्रियांकाच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमधील मुंबई वडापावची किंमत ऐकून थक्क व्हाल

गरीब घरातला श्रीमंत माणूस; नाव न सांगण्याच्या अटीवर पांडुरंगाचरणी 1 कोटींचं दान!

’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More