बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

नवी दिल्ली | काँग्रेस पक्षामधील दुखणी जुनी असून, वरवरच्या उपायांनी ती दूर होणार नाहीत. काँग्रेस पक्षाच्या संरचनेतच अनेक दोष आहेत, अशी टीका निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे.

प्रशांत किशोर यांनी केलेली टीका काँग्रेस पक्षाला आवडलेली नाही. त्यांच्या ट्विटला उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस पक्षाला प्रशांत किशोर यांच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही, असं त्यांनी म्हटलंय.

गेल्या जुलै महिन्यापासून आजवर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. त्यामुळे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच प्रशांत किशोर यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात यावा. त्यांना विरोध करणाऱ्यांना पक्षांतर्गत सुधारणा नको आहेत, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं.

दरम्यान, लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करताना काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या पक्षाला उभारी मिळेल अशी आशा काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी ही टीका केलीये.

थोडक्यात बातम्या- 

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”

असं काय झालं की, रतन टाटांना आली जेआरडी टाटांची आठवण!

“वसूली आली की सरकारचा ससा होतो अन् शेतकऱ्यांना मदत म्हटलं की कासव”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More