बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती, ते आकाशात उडत होते”

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रसने आपली सत्ता राखली आहे. मात्र निवडणुकी अगोदर 200 जागा जिंकू अशी दर्पोक्ती भाजप नेत्यांनी केली होती. तर भाजपला 100 जागादेखील मिळणार नाहीत, असा अंदाजनिवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज खराही ठरला. प्रशांत किशोर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेत्यांमध्ये विशेषत: अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती. ते आकाशात उडत होते. त्यामुळे ते जमिनीपासून दूर गेले. आम्ही विजयी होणार आहोत, असं जाहीर करून ते लढायला आले. मात्र त्या केवळ पोकळ बाता होत्या, असं प्रशांत किशोर म्हणाले. ‘द टेलिग्राफ’शी ते बोलत होते.

कदाचित माझ्या बोलण्यात तुम्हाला अहंकार वाटू शकेल. पण मला अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय आणि निवडणूक मॅनेजर वाटतात. त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कोणतं व्यवस्थापन कौशल्य दाखवलं?, असा सवालही प्रशांत किशोर यांनी केला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला धक्का दिला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी अस्वस्थ होत्या. त्यांनी मला फोन करून तातडीनं येण्यास सांगितलं, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूलनं आपली रणनीती बदलली. ही रणनीती भाजपच्या फारशी लक्षात आली नाही. थेट लोकांशी जोडले जाणारे कार्यक्रम तृणमूलनं हाती घेतले. जमिनीवर अधिकाधिक काम सुरू केलं, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

रिक्षाचालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात भीतीचं वातावरण, आजचा सामना पुढे ढकलला!

“…म्हणून पाटलांना कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला”

“पराभवाची सवय करून घेतली पाहिजे, कारण आता वारंवार फटके बसणारेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More