अखेर प्रशांत कोरटकरला अटक! ‘या’ ठिकाणावरून ठोकल्या बेड्या

Prashant Koratkar

Prashant Koratkar l छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या नागपूर येथील वादग्रस्त पत्रकार प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधून त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी लवकरच पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जाणार असल्याची शक्यता आहे.

दुबईतील फोटो व्हायरल, पासपोर्ट पोलिसांकडे जमा :

या प्रकरणात कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तिथेही अटकपूर्व संरक्षण नाकारण्यात आले. यामुळे कोरटकर परदेशात पळून गेला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला होता.

प्रशांत कोरटकरचा दुबईत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो कोलकाता विमानतळावरून पळून गेला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या पत्नीमार्फत पासपोर्ट ताब्यात घेतला. त्यामुळे तो देशाबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले होते.

Prashant Koratkar l सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार :

प्रशांत कोरटकरने केलेल्या अटकपूर्व अर्जावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, याचिकेची प्रत उपलब्ध नसल्याने कोर्टाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. दरम्यान, पोलिसांनी चौकशीस गती देत तेलंगणामधून प्रत्यक्ष अटक केली आहे.

News Title: Prashant Koratkar Arrested from Telangana for Threatening Historian Indrajit Sawant

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .