मनोरंजन

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचं निधन

मुंबई | अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी राजे यांची जीवनगाथा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेद्वारे रूपेरी पडद्यावर अभिनेते अमोल कोल्हे यांनी मांडली. मात्र या मालिकेमध्ये भूमिका साकारणारा युवा अभिनेता प्रशांत लोखंडे याचं निधन झालं आहे.

प्रशांत लोखंडेचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. 14 सप्टेंबरला रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला. प्रशांतच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ प्रशांत लोखंडे याने अब्दुला दळवी ही व्यक्तिरेखा साकारली होती.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत प्रशांतने सोनी मराठीवरील बाजी घोरपडे ही भूमिका साकारली होती. त्यासोबतच त्याने  स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ या गाजलेल्या मालिकेमध्येही त्याने महत्वाच्या भूमिकेत काम केलं होतं.

दरम्यान, ‘जगदंब क्रिएशन्स’ च्या सोशल मीडियावरुन प्रशांतच्या निधनाची दुःखद बातमी शेअर करण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही प्रशांतच्या निधनाने धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

‘सुशांतच्या फार्महाऊसवर रियाच्या आधी येत होती ही अभिनेत्री’; फार्महाऊस मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

…म्हणून 10 सरकारी पाठशाला कायमस्वरूपी बंद; शालेय शिक्षण विभागाच निर्णय

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

मराठा समाज आक्रमक!आजपासून कोल्हापूरमधूम मुंबई, पुण्याला दुध पुरवठा बंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या