जवानांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत परिचारकांचं निलंबन मागे

मुंबई | जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. चौकशी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये बोलताना जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांचं निलंबन करुन चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस केली होती. यासंदर्भातील ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला.

परिचारक काय म्हणाले होते?-

“एकदाही घरी न येता जवान वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झालाय. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे.”