बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहिल्याच ODI सामन्यात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवत प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्याची धमाकेदार खेळी

पुणे |  भारतीय संघाने पहिल्याच ओडीआय सामन्यात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवत 66 धावांनी विजयावर आपली मोहोर उमटवली. इंग्लंडला विजयी होण्यासाठी 318 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय बॉलर्सच्या बॉलिंग समोर इंग्लंडला 251 धावांवरच आपला गाशा गुंडाळावा लागला.

या पहिल्याच ओडीआय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यात भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्या या दोघांनी धमाकेदार खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. विजयाचं मोठं श्रेयं प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्या यांना जातं. पांड्याने 1990 मध्ये जॉन माॅरिस यांनी केलेलं रेकॉर्ड मोडीत काढलं आहे. जॉन माॅरिस यांनी 35 बॉल मध्ये 50 रण काढून आपल्या नावे रेकॉर्ड बनवला होता. त्यानंतर पांड्याने आता 26 बॉल मध्ये अर्धशतक पूर्ण करून जॉन माॅरिस यांचा रेकॉर्ड मोडून काढला.

एकूण 31 बॉल मध्ये 7 चौकार आणि 2 षटकार लावत कृणाल पांड्याने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. कृणालने सॅम करन या इंग्लंडच्या बॅट्समनची विकेटही घेतली. जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स आणि टॉम करन या इंग्लंडच्या बॅट्समनला अगदी निर्णायक क्षणावर आउट करून प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात धमाकेदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं.

भारताच्या विजयाने सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. इंग्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर भारत एकूण 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये 26 मार्चला खेळण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं” – तृप्ती देसाई

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण

“आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण त्यात सहभागी होईल” – नितीन राऊत

‘एटीएसने जप्त केलेली ‘ती’ व्हाेल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधील व्यक्तीची’; राष्ट्रवादीचा आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More