नवी दिल्ली | 64 वर्षांच्या प्रताप सारंगी यांची देशात ओडिशाचे मोदी म्हणून ओळख आहे. त्यांनी काल केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचा सोशल मीडियात एक जुना व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हीडिओ पाहून लोकांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये प्रताप सारंगी एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना दिसून येत आहेत. त्यात ते असं सांगत आहेत की मी नक्कीच अविवाहित आहे पण ब्रह्मचारी नाही.. त्यांच्या या वाक्याने लोकांना वाजपेयींची आठवण येत आहे.
ओडिशाचे 64 वर्षीय सारंगी यांचे राहणीमाण अत्यंत साधारण आहे. त्यांनी आपला प्रचारही सायकलवरुन केला होता. प्रचारासाठी त्यांनी काहीही खर्च न केल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, सारंगी यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा रंगलेली दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
-मोदींनी शिवसेनेला दिलेल्या खात्याबाबत संजय राऊत म्हणतात…
-सुषमा स्वराज मंत्रीमंडळात नाहीत; लोक म्हणतायेत आम्हाला तुमची खूप आठवण येईल…
-वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मोदींच्या मंत्रीमंडळातून ‘या’ मंत्र्याला वगळलं
-राज ठाकरेंची भूमिका काय? स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु
-महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे सोपावण्यात आली ‘या’ खात्यांची जबाबदारी
Comments are closed.