नवी दिल्ली | साहेब सगळ्यांचा बदला घेतला बरं का…. असे उद्गार नारायण राणेंच्या पाया पडताना नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काढले. आज एनडीएची नवी दिल्लीत बैठक होत आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांच्यात संवाद झाला.
प्रताप पाटील चिखलीकरांच्या उद्गारानंतर, वेल डन अभिनंदन, असं नारायण राणेंनी चिखलीकरांना उद्देशून म्हटलं.
अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातला वाद सर्वश्रूत आहे. राणे काँग्रेसमध्ये असतानाही अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचं फारसं जमत नव्हतं. याच पार्श्वभूमीमुळे चिखलीकरांनी राणेंना, साहेब बदला घेतला बरं… असं म्हटलं.
‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ याच न्यायाने चिखलीकरांनी राणेंची भेट घेऊन असे उद्गार काढल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-यापुढे काँग्रेसचा अध्यक्ष गांधी परिवारातला नको- राहुल गांधी
-दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने केली अटक
-राज्यातील या 5 आमदारांसह एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा
-“हंसराज अहिर यांचा पराभव म्हणजे दारूबंदीची पहिली विकेट”
-एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड
Comments are closed.