नागपूर | पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं म्हणून सरनाईक यांना ईडीने पुन्हा बोलवल्याचं वृत्त काही दिवासांपुर्वी पसरलं होतं. यासंबंधी अभिनेत्री कंगणानेसुद्धा सरनाईकांना टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसाच्या चालू असलेल्या अधिवेशनात कंगणाविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.
ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अभिनेत्री कंगणा राणावतने एक खोटं ट्विट केलं आहे. कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती विधानसभा अध्यक्षांकडे सरनाईक यांनी केली.
पाकिस्तानचा आणि माझा काहीही संबंध नाही. पाकिस्तानविरोधात आयुष्यभर मी लढलो. अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे, असं कंगणाने म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
रशिया-अमेरिकेवर मुख्यमंत्री बोलतात, महाराष्ट्रात काय दिवे लावलेत बोला- देवेंद्र फडणवीस
शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’-रविशंकर प्रसाद
‘कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबा पण…’; सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात आक्रमक
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”