बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी शरद पवारांची शिकवणी लावावी”

मुंबई | सेना-भाजप यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला हाणला होता. जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने शरद पवारांसोबत आघाडी केली आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संयमी वृत्ती स्वीकारली नाही. कारण अजुनही शिवसेनेची संकुचित वृत्ती आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांची शिकवणी लावावी, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना सिंधुदुर्गमध्ये जमावबंदीच्या आदेशावरही भाष्य केलं आहे.

नारायण राणे हे कोकणचे सुपुत्र आहेत. त्यांचा सिंधुदुर्ग दौरा असल्यामुळे राजकीय हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. सामान्य माणूस नारायण राणे यांना भेटू नये. यासाठी ठाकरे सरकारने कुहेतूने जमावबंदीचा आदेश लागू केल्याचा आरोप शेलारांनी केला आहे. त्यासोबतच शेलारांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली.

दरम्यान, ज्यांची जशी संस्कृती आहे तसे शब्द वापरले जात असल्याचं शेलार म्हणाले. यावर शिवसेेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मगरी असलेल्या विहिरीत टांगलं…” पुण्यातील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक प्रताप

मोठी बातमी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड खलबतं

“वरुण सरदेसाई… आता आलास तर तू परत जाणार नाहीस”

वादानंतर पहिल्याच भाषणात राणेंचा उडवून दिली खळबळ, “आपल्याच बंधूच्या पत्नीवर…”

“तुम्हाला सुट्टी नाही, लवकरच हिशोब चुकता करणार”; जो बायडन संतापले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More