बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना-भाजपच्या भांडणात…”; प्रताप सरनाईक यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

मुंबई | केंद्रात सत्तेत असलेलं भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात येतो. सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे खासदार प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यापासून शिवसेना आणि भाजप एकमेकांविरूद्ध आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्या अटकेचा सूड घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

‘मी सुरूवातीपासूनच सांगितलं आहे की, केंद्र आणि राज्यसरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जातो, त्यात मी देखील आहे’, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ‘मात्र, मला ईडीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांकडून त्रास झाला नाही, ते मात्र त्यांचं काम करत आहेत’, असंही सरनाईक म्हणाले.

काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहल्यानं मोठी खळबळ उडाली होती. भाजप केंद्रीय यंत्रणेचा वापर करून त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला होता. त्याचबरोबर त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर आता सरनाईक यांच्या वक्तव्यानं शिवसेना नेते नाराज असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

दरम्यान, संजय राठोड, प्रताप सरनाईक आणि अनिल परब हे शिवसेनेचे तीन मोठे नेते भाजपच्या रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राठोड आणि अनिल परब यांचं नाव घेतलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“वरुण सरदेसाई… आता आलास तर तू परत जाणार नाहीस”

वादानंतर पहिल्याच भाषणात राणेंचा उडवून दिली खळबळ, “आपल्याच बंधूच्या पत्नीवर…”

“तुम्हाला सुट्टी नाही, लवकरच हिशोब चुकता करणार”; जो बायडन संतापले!

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील पोलिसाची बदली, संपत्ती ऐकाल तर डोळेच फिरतील!

पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More