मुंबई | दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय. पण ते तानाजी मालुसरे 16 व्या शतकातील होते. हा तानाजी 21 व्या शतकातला आहे. ते तानाजी रयतेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले होते. पण हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल, असं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी म्हटलंय.
मी तानाजी मालुसरे सारखा आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल. माझी संपत्ती एवढी मोठी असेल तर त्याचा मला आनंद आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
मी रिक्षा चालवायचो. मेहनत करून इथे आलो. जे राजकारण सुरू आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. ईडी जेव्हा बोलावेल, तेव्हा मी चौकशीला जाईल. हे कॉर्पोरेट वॉर आहे. नेमका हा काय घोळ सुरू आहे, ते मला माहीत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
मी पूर्वी जसा होतो, तसाच आताही आहे. फक्त माझ्या पत्नी आणि मुलांना या सर्व प्रकरणात नाहक त्रास देण्यात आला याचं दु:ख आहे, असं सरनाईक म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“प्राण जाये पर वचन न जाये, अशी शिवसेना आहे”
2021 सालची जनगणना ही जातनिहाय व्हावी- रामदास आठवले
…हे पाहून अंगी बारा हत्तीचं बळ आलंय- राजू शेट्टी
…म्हणून शरद पवार संतापले अन् चालू पत्रकार परिषदेतून माझी चूक झाली असं म्हणत गेले निघून!
Comments are closed.