मुंबई | ईडीने नक्की का कारवाई केली, माझ्या मुलाला का ताब्यात घेतलं, याची माहिती मीदेखील अजून घेत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
सरनाईक यांनी ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्यात साधारण दीड तास चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई केली.
महत्वाच्या बातम्या-
‘उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता’; शरद पवारांचा दानवेंना टोला
“त्यांचे बाप नव्हते तेव्हापासून भाजपमध्ये काम केलं, आता आयत्या पिठावर रेघा मारत आहेत”
शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती- संजय राऊत
“लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार असेल”