मला तिकिट मिळू नये, त्यासाठी पक्षातील लोकांनी सुपारी दिली; या खासदाराचा धक्कादायक आरोप

Maharashtra l राज्यात लोकसभा निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या आहेत. मात्र या मतदार संघात अनेक राजकीय गणितं बदलली होती. अशातच आता नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एक मोठा गौप्य्स्पोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा मतदार संघ चर्चेत आला आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला धक्कादायक आरोप :

चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. येत्या आगामी काळात राज्यात जर सत्ता आली तर मंत्रिमंडळात चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावे, यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. याशिवाय आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली होती, तसेच पैशाचे आमिष दाखविल्याचा खळबळजनक आरोप यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

सध्या चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा क्षेत्रात ठिकठिकाणी धन्यवाद सभा आयोजित केल्या जात आहेत. अशातच काल संध्याकाळी राजुरा शहरात रॅलीनंतर आयोजित केलेल्या धन्यवाद सभेत बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, राज्यात सरकार आलं तर मंत्रिपद गडचिलोरीला नाहीतर चंद्रपूरला मिळणार यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

Maharashtra l पैशांचे दाखवले आमिष :

सर्वात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या ब्रम्हपुरी मतदारांचे आमदार आहेत. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर त्यांच्या या वक्तव्याचा रोख विजय वडेट्टीवार यांच्याकडेच होता अशा चर्चाना उधाण आलं आहे.

याशिवाय खासदार प्रतिभा धानोरकर सभेत बोलतांना म्हणाल्या की, आपल्याला तिकीट मिळू नये व आपला विजय होऊ नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देखील दिली गेली होती, तसेच त्यांना पैशाचे देखील आमिष दाखवले गेले असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

News Title- Pratibha Dhanorkar Big Statement On Vijay Wadettiwar

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बजरंग सोनावणेंनी आखला पुढील मास्टर प्लॅन

सावधानता बाळगा! आज या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता

“कदाचित हे माझं शेवटचं उपोषण..”; मनोज जरांगेंचा थेट इशारा

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे हे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाही”

‘तुला खाऊ देतो’ म्हणत 6 वर्षाच्या चिमुकलीला शेतात नेलं अन्…; नराधमाच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला