बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रतिज्ञा’ फेम अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन, 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | बाॅलिवूड आणि टीव्ही अभिनेते अनुपन श्याम यांचं निधन झालं आहे. प्रकृती ठीक नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांनी काल 8 ऑगस्टला रात्री अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांच्या निधनाची बातमी अशोक पंडित यांनी दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘दिग्गज अभिनेता अनुपम श्याम यांचं मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे निधन झालं. हे सिनेसृष्टी आणि टीव्ही जगताचं मोठं नुकसान आहे.

अभिनेते अनुपम श्याम यांनी लोकप्रिय मालिका ‘मन की आवाज प्रतिज्ञा 2’ या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या अशा अवकाळी जाण्यानं कलासृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, अनुपम यांची अनेक महिन्यांपासून प्रकृती खालावली होती. त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होत होता. त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या भावानं कलासृष्टीतील अनेक लोकांकडून मदत घेतली होती. उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे दोन दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. आज रात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर आणि बाॅलिवूडवर शोककळा पसरली आहे.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘घरात बसलेलं तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमलं’; लोकलच्या निर्णयानंतर भाजपची प्रतिक्रिया

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

इंग्लंडच्या मदतील आला पाऊस, पहिला कसोटी सामना अनिर्णित!

मोठी बातमी! मुंबई लोकलसेवा सुरू, मात्र काढावा लागणार ‘हा’ पास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More