Pratik Babbar | दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी 80 आणि 90चं दशक आपल्या अभिनयाने गाजवलं. आज देखील स्मिता पाटील यांच्या चित्रपटांची चर्चा होते. आपल्या भूमिकेने त्यांनी लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टि हादरली होती. दरम्यान, स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर कायम चर्चेत असतो. आपल्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेश्नल लाईफमुळे तो सतत चर्चेत राहतो. सध्या प्रतिकने त्याच्या आयुष्यबद्दल एक नवा खुलासा केला आहे.
ड्रग्सचं व्यसन-
अभिनेता प्रतिक बब्बर (Pratik Babbar) यांनी अनेक हिंदी चित्रपटात महत्तावच्या भूमिका साकारल्या आहेत. जाने तू या जाने ना, एक दिवाना था… या आणि अशा अनेक चित्रपटात प्रतिकने मुख्य भूमीका साकारल्या आहेत. दरम्यान, प्रतिकने आपल्या पर्सनल लाईफबद्दल एक खुलासा केला आहे. वयाच्या 12, 13 वया वर्षापासून प्रतिक ड्रग्सचं सेवन करत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
इंडस्ट्रित येण्याआधीच व्यसन-
प्रतिकला (Pratik Babbar) इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वीच ड्रग्सचं व्यसन लागला होतं. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना प्रतिक म्हणाला की, या व्यसनाचा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम झाला आहे. लोकांना वाटतं की अरे, तो फिल्म इंडस्ट्रीत आला, त्याला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आणि मग त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली. पण माझ्यासबोत असं घडलेलं नाहीये.
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला की, मी 12-13 वर्षांचा होतो, तेव्हापासून मी ड्रग्ज घेत होतो. मात्र, त्याचं कारण चित्रपटसृष्टी नाही. दुर्दैवाने, माझं संगोपन वेगळ्या पद्धतीने झालं आणि माझी कौटुंबिक परिस्थिती थोडी कॉम्प्लिकेटेड होती. त्यामुळे मी ड्रग्ज घ्यायला लागलो. इंडस्ट्रीतील प्रसिद्धी आणि पैसा यामुळे मला ते व्यसन जडलं नव्हतं.
ड्रग्जचा माझ्यावर परिणाम झाला आणि अजूनही होतो. खासकरून नात्यांवर परिणाम होतो. ड्रग्जचा संबंध आघाताशी आहे. जोपर्यंत तुम्ही ट्रॉमातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम नात्यांवर आणि आयुष्यातील इतर गोष्टींवर होत राहील.
News Title : pratik babbar reacts on drugs addiction
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर…? शरद पवारांच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”
कराळे मास्तरांनी मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला! नेमकं काय म्हणाले
…म्हणून अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात; कधीच खरेदी करणार नाहीत स्वतःच घर
महायुती की पुन्हा महाविकास आघाडी, राज्यात कोण मारणार बाजी?; सर्व्हेतून मोठी माहिती समोर