Top News

“धुळे नंदुरबारच्या निकालावरून महाविकास आघाडीचे उद्याचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होतं”

मुंंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा पहिल्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली 50 टक्के ही मतं राखु शकली नाही. यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे काय भविष्य राहील हे स्पष्ट होत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचे नेते मतभेद नसल्याचा कितीही दावा करत असले तरी त्यांच्यात अलसेल्या विसंवादाचा स्फोटच आज झाल्याचं दरेकर म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या अमरिश पटेल यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. अमरिश पटेलांना घवघवीत मते मिळाली आहेत. पटेल यांना 332, तर काँग्रेसच्या अभिजित पाटलांना यांना 98 मतं मिळाली आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नावं

“सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही”

“योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली”

‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे हरियाणाचे मनोहरलाल खट्टर यांचे सरकार अडचणीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या