मुंबई | युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी पटकावला.
रणजीतसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी सत्कार केला. त्यावरून भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंना टोला लगावला.
मुख्यमंत्री महोदय, शिक्षणमंत्री महोदया, थोडे कष्ट घेऊन परितेवाडी-बार्शी गाठली असती आणि डिसले गुरुजींचा सत्कार केला असता, तर तो खऱ्या अर्थाने गुरुजींचा, त्यांच्या कुटुंबाचा, शाळेचा, विद्यार्थ्यांचा, त्या परिसराचा सत्कार ठरला असता, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.
जागतिक पातळीवर ज्यांनी राज्याचं नाव रोशन केलं, त्या सत्कारमूर्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून केलेला सत्कार म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरली, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
थोडक्यात बातम्या-
“टिकटाॅकवर ओळख झालेल्या महिलेकडून मुलावर बलात्कार”; वडिलांची पोलिसात तक्रार
शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी स्वत:ला दिली तानाजीची उपमा; म्हणाले…
“प्राण जाये पर वचन न जाये, अशी शिवसेना आहे”
2021 सालची जनगणना ही जातनिहाय व्हावी- रामदास आठवले
Comments are closed.