बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेलेल्या शुभमच्या आईचा हंबरडा ऐकून प्रवीण दरेकरांना अश्रू अनावर!

सांगली | सांगलीतील शुभम जाधव हा 22 वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला. त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सांगली जिल्ह्याच्या दौरा केला. यावेळी दरेकरांनी शुभमच्या कुटूंबियांचं सांत्वन केलं. आपलं दु:ख दरेकर यांच्याकडे मांडताना शुभमच्या आईने हंबरडा फोडला.

आम्हाला आधार देणारा निघून गेला. पावसाने आमचा घात केला. आमचे भविष्य बरबाद झाले. आता आम्हाला न्याय कोण देणार?, अशा शब्दात त्या आईने व्यथा मांडली.

हा विषय अतिशय संवेदनशील असून याप्रकरणी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू व त्यांना लवकर मदत मिळवून देऊ. ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करु नका, अशा शब्दांत दरेकरांनी कुटुंबियांना धीर दिला.

महत्वाच्या बातम्या-

भाजप हा मोठा पक्ष आहे, कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही- देवेंद्र फडणवीस

“ती मागणी केल्याने मला पक्ष सोडायला लावला, आता तीच वेळ खडसेंवर आली “

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

थिल्लर-चिल्लरकडे बघायला मला वेळ नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More