प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, बाहेर येताच दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई | भाजप नेते तथा राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची मुंबै बँक बोगस मजुर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकरांची तीन तास चौकशी केली. मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणामुळे काही दिवसांपूर्वी दरेकरांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली होती. चौकशीनंतर प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
सभासद म्हणून काय लाभ घेतला?,बँकेकडून काय लाभ घेतला?, अशा प्रकारचे अनेक प्रश्न तीन तासांच्या चौकशीमध्ये विचारले गेले. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. अनेकवेळा तेच तेच प्रश्न विचारून भंबावून सोडण्याचा प्रयत्न केला, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.
ज्यांची नियत साफ आहे त्यांच्यावर या गोष्टींचा परिणाम होत नाही. हा गुन्हा एका संस्थेपुरता मर्यादित असताना इतर बँक, संस्था आणि अनेक विषयांसंदर्भात प्रश्न विचारले गेले. तरीदेखील तपासाअंतर्गत जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न केला गेला. तपासावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त त्याठिकाणी मॉनिटर करत होते, असा आरोपही प्रवीण दरेकरांनी केला आहे.
दरम्यान, सहा सात वेळा पोलीस अधिकाऱ्यांना फोन आले. चार पाच वेळा पीआय केबिनमध्ये गेले, बाहेर गेले. माझा फोन चार्जिंगसाठी बंद ठेवण्यात आला होता. माझा समज झाला की, फोन काढून बंद केला. सरकारचा पोलिसांवर प्रचंड दबाव आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“न्यायालयाने भोंगे खाली उतरावायचे आदेश दिले आहेत त्याचं पालन करा आणि मग…”
अभिनेत्री सोनम कपूरचे बेबी बंप फ्लाॅन्ट करताना फोटो व्हायरल, पाहा फोटो
कडाक्याच्या उन्हात अवकाळी पावसाचं सावट, पुढील 4,5 दिवस महत्त्वाचे
“राज ठाकरेंचा सगळा सिझनेबल कार्यक्रम, ते ऋतूप्रमाणे बदलणारे नेते”
“लग्न एकासोबत केलं आणि संसार दुसऱ्यासोबत, हे चांगलं नाही”
Comments are closed.