बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं.

या प्रकरणामुळे देशमुखांना राजीनामाही द्यावा लागला. यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या खाद्यांवर गृहमंत्रिपदाची धुरा देण्यात आली. मात्र या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरू आहे. अशात गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सोलापुरातील व्यापाऱ्याने केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. हे जर खरं असेल, तर फक्त गृहमंत्री बदलून चालणार नाही. कारण महावसुलीचा हा व्यवसाय थांबणारा नाही. राज्याचे गृहमंत्री बदलले तरी हप्ता वसुली चालू असेल, तर यावर काय पर्याय काढणार आहात आता?, असं ट्विट दरेकरांनी केलं आहे.

दरम्यान, बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे. मात्र पोलिसांनी सराफ व्यावसायिकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या- 

अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ‘द फिशरमॅन्स डायरी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

पुण्यातील अलिशान हॉटेलमध्ये हायप्रोफाईल राडा, पतीनं पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं अन्…

‘हप्ते गृहमंत्र्यांना पोहोचवावे लागतात…’; सराफाने पोलीस निरीक्षकावर केलेल्या आरोपांनी खळबळ

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचं पालन अशक्य- अमित शहा

औरंगाबादेत PSI आणि महिला हवालदाराचं सूत जुळलं, पत्नीसोबत केलं लज्जास्पद कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More