महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा”

मुंबई | मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून जळगावमधील मनोज चौधरी या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

मनोज चौधरी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं लिहिलं आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार दिवाळीपूर्वी द्या अन्यथा भाजपच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपलं आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

संग्राम देशमुख माझा जावई नाही, मेधाताई काही माझ्या दुश्मन नाही- चंद्रकांत पाटील

हायकोर्टाने स्वत: दखल घेऊन अर्णब गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी- देवेंद्र फडणवीस

तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार- अनिल परब

अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला

महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचं आणि संवेदनाहीन, गिरीश महाजन यांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या