महाराष्ट्र वर्धा

“संजय राऊतांच्या चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही”

वर्धा | आधी तुम्हाला काय चौकश्या करायच्या त्या करून घ्या. मग तुमच्या 100 नव्हे 120 नेत्यांची यादी देतो. त्यांच्याही चौकश्या होऊनच जाऊ द्या, असं आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिलं होतं. याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलय.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. ते वर्ध्यात माध्यमांशी बोलत होते.

भाजपच्या नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ आहे, हे जनतेला देखील माहीत आहे. त्यामुळे जनाधार भाजपला राहिला आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

संजय राऊत यांनी यादी देऊ, असं बोलून चार दिवस झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांना तात्काळ यादी देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. तत्काळ यादी देऊन टाका, असं दरेकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा” 

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक!

“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात, या स्वप्नाच्या आशेने पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला” 

मीमुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस

“संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या