मुंबई | मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोक जास्त आहे, या मोर्चात शेतकरी कमी आणि घुसवलेले लोक जास्त आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो शेतकरी मुंबईत धडकले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे संवेदनशील आहे. ते सगळ्यांना भेटतात त्यांच्यावर विनाकारण टीका नको, असं म्हणत दरेकर यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं.
भेंडी बाजारातल्या महिला शेतकरी कशा? काल या महिला आझाद मैदानावर होत्या, असा सवालही प्रवीण दरेकर यांनी उपस्थितीत केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही, काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी”
“पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का?, मोदींनी त्यांची साधी चौकशी केली का?”
“महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगणाला भेटायला वेळ पण शेतकऱ्यांना नाही”
गायीची जशी पूजा केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा- अबू आझमी
ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही- शरद पवार
Comments are closed.