मुंबई | शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा विसर पडला आहे. संपूर्ण पक्ष हा शरद पवार यांच्यापुढे लीन झाल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. ते टीव्ही 9मराठीशी बोलत होते.
कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. ते केवळ स्वार्थासाठी हे करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीतला फरक कळतो, असं दरेकर यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी कृषी कायदे आणण्यासाठी याच राजकीय पक्षांनी खुलेआम पत्रक काढले होते, समर्थन दिलं होतं. त्यामुळे आजचा बंद हा शेतकऱ्यांचा आडून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली.
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे
कृषीमंत्री असताना पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर केला खुलासा; म्हणाले…
“कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान की कृषीमंत्री?”
देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं जगातील प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य’; राऊतांचं नागरिकांना आवाहन
Comments are closed.