महाराष्ट्र मुंबई

“राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं पाहिजे”

मुंबई | औरंगाबादच्या नामकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय असून कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं गेलं पाहिजे, असं दरेकर यांनी म्हटलंय.

कोणत्याही शहराचं नामांतर करायचं असेल तर महानगरपालिकेचा प्रस्ताव, त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आणि त्यानंतर केंद्राची मंजुरी अशी प्रक्रिया असते. औरंगाबादचं नामांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेत तुमचीच सत्ता आहे. त्या ठिकाणी ठराव करावा आणि मंत्रिमंडळाला तो देण्यात यावा, असं दरेकर म्हणालेत.

राज्य सरकारचा एकही विषय, एकही दिवस आणि एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कोणतीही गोष्ट असली की केंद्राकडे बोट दाखवलं जात मग तुम्ही राज्य सरकार का चालवता?, असा सवालही दरेकर यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही- संजय राऊत

पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार

शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो- हसन मुश्रीफ

कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन- ओमर अब्दुल्ला

कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या