Top News

“सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल”

मुंबई | एखाद्या घटनेचं राजकीय स्वार्थासाठी भांडवल करुन घेणे ही सुनिल तटकरेंची वृत्ती आहे. त्यांनी गेली 20 ते 25 वर्षात विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, असं म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

प्रवीण दरेकर पेणमध्ये भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्याविरोधातील निषेध मोर्चात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय.

प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडलं जातंय. भाजप या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं सुनील तटकरे म्हणालेत.

पोलिसांनी सारासार विचार न करता रात्री 12.30 वाजता माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली. यातून तटकरेंनी पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे सिद्ध केलं. या प्रकरणाचा जाब येत्या विधानसभा अधिवेशनात सरकारला विचारणार आहे, असं दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…”

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

“उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या