मुंबई | मनुसख हिरेन प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.
आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. तसेच सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?, असा सवालही प्रविण दरेकरांनी केला.
मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात सचिन वाझे यांचा सहभाग असावा, असं प्रथमदर्शनी दिसत आहे. विमला मनसुख यांनीही सचिन वाझे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सचिन वाझे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.
दरम्यान, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणात पुरावे नष्ट करण्याची ठाकरे सरकारची मोडस ऑपरेंडी एकाचप्रकराची असल्याचा आरोप प्रविण दरेकरांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर
देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!
‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण
दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…
भर रस्त्यात माथेफिरुचा चौघांवर चाकू हल्ला; एका व्यक्तीचा मृत्यु, तीन जण गंभीर जखमी
Comments are closed.