बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा, असं भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचं आणि टीका करण्याचं काम एकनाथ खडसेंना दिलं गेलं असावं. एकनाथ खडसेंनी राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दरेकर यांनी खडसेंना दिला आहे.

एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीसांना व्हिलन ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. मात्र आता त्यांनी हे थांबवावं, असं दरेकर म्हणालेत.

दरम्यान, ओबीसी समाजातील अनेक लोकांना सत्तेतील आणि पक्षातील सन्मानाची पदे दिली गेली आहेत, त्याचा विसर खडसेंना पडला असावा, असा टोला दरेकर यांनी लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

मी निवृत्त होतेय पण…- पी. व्ही. सिंधू

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांशी आमचा संबंध नाही- गिरीश महाजन

‘माणुसकीचा फ्रीज’, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा उपक्रम

“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतप्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्प का?”

‘… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल’; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More