मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती आहे. याविषयी माध्यमांशी बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही9 मराठी’शी बोलत होते.
युती ही समविचारी घटकांची होत असतो. वैचारिक विचारधारावर होत असते किंवा तशाप्रकारचे वातावरण असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशाप्रकारचे काही वातावरण आले तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगलं वातावरण निर्माण होईल असं मला वाटत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या”
शिक्षण खात्यातील नोकर भरतीबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा!
राकेश टिकैत यांनी अश्रू काय ढाळले; शेतकऱ्यांचा महापूरच आला!
सर्वसामान्यांना झटका; वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय
राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत- स्मृती इराणी
Comments are closed.