महाराष्ट्र मुंबई

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

मुंबई | एसटीसाठी जर कर्ज घ्यायचे असेल तर राज्य सरकारची कर्ज घेण्याची क्षमता आहे. राज्य सरकारने कर्ज घेऊन बाँड निर्माण करावेत व एसटीचा कारभार चालवावा. पण एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभारणं योग्य नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

कर्मचाऱ्यांचे थकित पगार देण्यासाठी एसटीच्या मालमत्ता गहाण ठेवणे, महाराष्ट्राला शोभणारे नाही, प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सध्या सरकारला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. उद्या मंत्रालयातील शासकीय कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे असेल तर तुम्ही मंत्रालय गहाण ठेवणार का, असा सवाल दरेकर यांनी केलाय.

दिवाळी तोंडावर असल्यामुळे वेळेत पैसे उभे करणे गरजेचे आहे. पण कर्जाच्या माध्यमातून खाजगीकरणाचा तर डाव नाही ना?, असं दरेकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता…”

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

“देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?”

‘तुम्ही कठीण काळातही भन्नाट काम केलं’; मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून कौतुक

दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण…- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या