महाराष्ट्र मुंबई

‘आम्ही चौकशीला घाबरत नाही’; प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

मुंबई | विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या कथीत घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. यावर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिलीये.

गेल्या काही दिवसात आम्ही सरकारच्या अनेक घोटाळ्यांबाबत बोललो. सरकारला उघडं पाडण्याचं काम केलं. त्यामुळे सूडाचं राजकारण करत ही चौकशी करण्यात येत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ही चौकशी म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. उच्च नायालयानं या प्रकरणातील दोन याचिका फेटाळून लावत क्लीन चिट दिली आहे, असं दरेकर म्हणालेत.

कसलीही चौकशी करा, आपण चौकशीला घाबरत नसल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे. मुंबै बँक ही सातत्यानं नफ्यात आहे. तिला अ वर्ग दर्जा मिळाला आहे. या बँकेवर एकटा प्रवीण दरेकर नाही. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही प्रतिनिधी आहेत, असं दरेकरांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘आम्ही स्वप्न बघत नाही, थेट कृती करतो’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

अहमद पटेल यांचं योगदान काँग्रेस पक्ष विसरू शकणार नाही- विजय वडेट्टीवार

“भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या”

जेवढ्या चौकशा करायच्या त्या करा, आम्ही घाबरत नाही- संजय राऊत

ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या