महाराष्ट्र मुंबई

विजय वडेट्टीवारांच्या त्या भूमिकेला भाजपचं समर्थन!

मुंबई | मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये, असं म्हणत प्रवीण दरकेरांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेला समर्थन दिलंय.

मराठा आरक्षण वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असं दरेकर यांनी म्हटल आहे.

राज्य सरकारमधील एक मंत्री जर मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा, अशी मागणी करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असं प्रवीण दरेकर म्हणाले

महत्वाच्या बातम्या-

महिलेने मारहाण केल्यानंतरही संयमाने परिस्थिती हाताळणाऱ्या एकनाथ पार्टेंचा गृहमंत्र्यांकडून सत्कार!

“भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

“एक वेळ अशी येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या