बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल”

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईनंतर आमदार राहुल नार्वेकर, रवी पाटील, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या हे अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

अन्वय नाईक यांच्या परिवाराला न्याय जरुर मिळाला पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यामुळे सरकार दुखावले गेले होते. त्यामुळे सरकारने सुडाच्या भावनेने कट रचून अर्णव गोस्वामी यांना अटक केली, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

ठाकरे सरकारने पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अहंकारी भावनेने अटक केली आहे. त्यांच्या या वृत्तीचा देशपातळीवर धिक्कार होत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“अर्णब आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही”

“सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचं नाव, तरीही कारवाई का झाली नाही?”

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल म्हणाले…

“अर्णब गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी”

ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार- किरीट सोमय्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More