बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर

मुंबई | केंद्र सरकारने पुन्हा एकदा घटनादुरूस्तीमध्ये बदल करत आरक्षणाचा अधिकार राज्याकडे सोपवला आहे. यावर बोलताना मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे उपप्रमुख अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राकडून आरक्षणाचा अधिकार राज्यांना मिळाला म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला गैरसमज असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाणांच्या या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं, अशी झाली असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. त्यामुळे 102व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र, राज्य सरकारची हतबलता असल्यामुळे ते आरक्षण देऊ शकत नसल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कधी केंद्र सरकारवर तर कधी राज्यपालांवर आरोप करण्याचं काम सुरु आहे. राज्यपाल हे एका राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकार खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत. राज्यपाल एखाद्या दौऱ्यावर गेले तर ते राजकारण नाही, पालकत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी जात आहेत, असं म्हणत दरेकरांनी सरकारला टोला हाणला आहे.

थोडक्यात बातम्या-

बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती

कौतुकास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली आयएसएस, देशात मिळवली 12वी रॅंक

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली, वाचा आजची आकडेवारी

लाखोंच्या आयुष्यातील आनंदसागर हरपला, शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत मालवली!

केंद्राने आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिला म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा हा गैरसमज कारण…- अशोक चव्हा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More