पुणे | भाजप सरकारने खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकार आल्यानंतर माझी बाजू मांडून मला शासन स्तरावर काम करण्याची संधी दिली, असं ज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक, नेत्रतज्ज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केलं होतं. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याप्रमाणे प्रशासनातील अधिकाऱ्याने सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारं नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला असल्याचं दरेकर म्हणाले.
दरम्यान, तात्याराव लहानेंसारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये”
“मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले”
“कुठलाही संकल्प नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसं म्हणायचं?”
“कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे यावरून अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?”
निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट, महाराष्ट्रासाठी काय?- आदित्य ठाकरे