मुंबई | मुंबई बँक (Mumbai Bank) मजूर संस्था अंतर्गत निवडणूक लढवल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी आता न्यायालयाने प्रवीण दरेकरांना आणखी एक धक्का दिला आहे.
गुन्हा दाखल झाल्ययानंतर अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी प्रवीण दरेकरांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) दरेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने दरेकरांना मोठा धक्का बसला आहे.
दरेकरांनी 2017 मध्ये मजूर म्हणून संस्थेकडून मोबदला स्वीकारला आहे आणि त्यावेळेस ते नागपूरला होते, हे दरेकरांचा जामीन अर्ज फेटाळण्याचे मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. तर प्रथमदर्शी पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, याच निरिक्षणाच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करायचा असून तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावे, असा अर्ज प्रवीण दरेकरांच्या वकिलांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“युक्रेनने नाटो ऐवजी आमच्या मुख्यमंत्री ठाकरेंकडेच मदत मागायला हवी होती”
‘मी राज्यात मंत्री असतो तर मुंबईत…’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
“ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही”
“तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात”
शिवसेना नेत्याचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.