Top News आरोग्य खेळ

गोळी घालून स्वतःचं आयुष्य संपवायला निघाला होता प्रवीण कुमार; या एका गोष्टीनं मन बदललं!

England batsman Craig Kieswetter (R) exchanges words with Indian cricketer Indian cricketer Praveen Kumar following Kieswetter's dismissal during the only Twenty20 match between India and England at The Eden Gardens in Kolkata on October 29, 2011. AFP PHOTO/Dibyangshu SARKAR (Photo credit should read DIBYANGSHU SARKAR/AFP/Getty Images)

नवी दिल्ली | एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा बेस्ट स्विंग बॉलर अशी ओळख असलेला प्रवीण कुमारने एक मोठा खुलासा केला आहे. माझी डिप्रेशनची समस्या इतकी वाढली होती की आत्महत्येचे विचार माझ्या मनात आले असल्याचं प्रवीण कुमारने सांगितलं आहे.

मानसिक आरोग्याबाबत जास्त खुलेपणाने बोललं जात नाही. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने देखील मानसिक आरोग्याबाबत बोललं गेलं पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं. भारतीय संघाच्या बाहेर गेल्यानंतर प्रवीण कुमारला डिप्रेशन येऊ लागलं. हरिद्वारला जात असताना स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने आयुष्य संपवायचं होतं. पण, गाडीतील मुलाचा फोटो पाहिल्यांनतर मी विचार बदलला असल्याचं प्रवीणने सांगितलं.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना प्रवीण म्हणाला, मी स्वत:लाच म्हणालो हे सर्व काय सुरुये, आता सगळं संपवून टाकूया. पण माझ्या मुलाचा फोटो पाहिल्यानंतर मी ते पाऊल उचलू शकलो नाही. भारतात डिप्रेशनबाबत अधिक बोललं जात नाही. त्याशिवाय डिप्रेशनविषयी मी कोणाशी बोलूही शकत नव्हतो.

प्रवीणने 2007 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळला होता. जयपूरच्या वनडे सामन्यात पाकिस्तान विरुद्ध त्याला प्रथमच खेळण्याची संधी मिळाली. वनडेमध्ये सामन्यात त्याचा इकोनॉमी रेट 5.13, टेस्टमध्ये 2.59 आणि टी -20 मध्ये 7.42 होता. शिवाय प्रवीणने वनडेमध्ये अर्धशतक झळकावलंय.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईत रहिवाशी इमारतीचा भाग कोसळला; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

“सहा लाखासाठी माझी संपत्ती विका, आमचे अवयव दान करा”; चिठ्ठी लिहून उचललं काळजाचा थरकाप उडवणारं पाऊल

‘मी पुन्हा येईन’ ही घमेंड नाही तर… फडणवीसांची बाजू घेत राणेंचं पवारांवर टीकास्त्र

कोरोनाच्या काळात बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.