महाराष्ट्र मुंबई

हैदराबादमध्ये शिवशाही… जागेवर खात्मा- प्रवीण तरडे

मुंबई | हैदराबाद बलात्कार आणि एन्काऊंटर प्रकरणी संपूर्ण देशातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आरोपी आम्हाला तपासात सहकार्य करत नव्हते आणि ज्यावेळी आम्ही त्यांना गुन्हा घडलेल्या घटनास्थळी घेऊन गेलो त्यावेळी त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, असं सांगत म्हणून आम्ही त्यांचा एन्काऊंटर केला, असं हैदराबाद पोलिसांनी सांगितलं आहे. त्यावर हैदराबादमध्ये आज खरी शिवशाही अवतरली, असं अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी म्हटलं आहे.

आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी बंदूक हिसकावून  घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केली, त्यामुळं स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे. त्यावर पोलिसांनी आरोपींचा जाग्यावर खात्मा करत पीडितेला न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन असं तरडे म्हणाले आहेत.

दुसरीकडे ज्या ठिकाणी एन्काऊंटर झाला त्या ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचे आदेश मानवधिकार आयोगाने दिले आहेत. नेमक्या कोणत्या कारणासाठी एन्काऊंटर करण्यात आला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं मानवधिकार आयोगाने म्हटलं आहे.

दरम्यान, स्वसंरक्षणाठी पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर केला आहे तर आता पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून दिला असं कसं म्हणायचं? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या