बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला प्रविण तरडेंचा पाठिंबा, म्हणाले…

मुंबई | अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते. अशातच सध्या तिच्या पोस्टनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी हेमांगीनं “बाई, बुब्स आणि ब्रा” या चार चौघात चर्चेसाठी टाळल्या जाणाऱ्या विषयावर भाष्य केलं आहे.

हेमांगीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत ती किचनमध्ये चपाती लाटताना दिसतेय. गोल चपाती कशी लाटावी, असा तिचा व्हिडीओ होता. मात्र नेटकऱ्यांनी हेमांगीला अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करण्यात आलं. मात्र यावर हेमांगीनं पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेमांगीच्या या पोस्टनंतर कलाकारमंडळींनी तिला पाठिंबा दिला असून बेधडक पोस्टसाठी तिचं कौतुकही केलं आहे. यातच विचार म्हणून खतरनाक, लेखन म्हणून वरचा दर्जा, साहित्य म्हणून कालातीत, तू लढ हेमांगी, असं म्हणत प्रविण तरडे यांनी हेमांगीच्या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, हेमांगीनं बाई, बुब्स आणि ब्रा’ या शीर्षकाची पोस्ट लिहित म्हटलं की, मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची की नाही ही माझी पंसत आहे, अशा आशयाची पोस्ट हेमांगीनं शेअर केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

शेतकरी आंदोलनाच्या तोडग्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संघटनांचं मोठं पाऊल

‘माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा???

“माझी जन्मभूमी मुंबई सुरक्षित हातात आहे याचा मला आनंद आहे”

मंत्रालयात खळबळ! एकनाथ खडसेंना क्लीन चीट देणारा ‘तो’ अहवाल गायब

“नानांनी त्या विषयाला फार गांभिर्याने घेऊ नये”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More