बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत’; प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन भरपावसात माणगावमध्ये दाखल

मुंबई | कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात महापूर आला असून चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढल्याने चिपळूणची अवस्था भीषण झाली आहे. यानंतर पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन तातडीने माणगावमध्ये दाखल झाले आहेत.

बचाव दल आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. सकाळपर्यंत पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करेल. आम्ही सुद्धा एनडीआरएफ टीमसोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाड आणि रायगडचा परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरं जावं लागत आहे, असं दरेकर म्हणालेत.

पावसामुळे कोकणवासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, परंतु आजवर आलेल्या अनेक संकटातून बाहेर पडलेला कोकणी माणूस आजही धीराने ह्या संकटाला सामोरा जाईल. या नैसर्गिक संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात दरेकरांनी पूरग्रस्तांना धीर दिला आहे.

दरम्यान, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत.

थोडक्यात बातम्या- 

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने घेतला मोठा निर्णय!

कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा धोका?; पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

“केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्रावर संकट, मोदींनी सढळ हाताने मदत करावी”

चिपळूण आणि खेड भागात भीषण परिस्थिती; NDRF च्या तुकड्या तैनात

महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; बचावकार्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिकॉप्टरची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More