बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर द्या ठाकरे सरकार!; पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं विचारले ‘हे’ 14 प्रश्न

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी भाजप शर्थीचे प्रयत्न करत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा थेट आरोप केला होता. त्यानंतर हे सरकार पोलिस तपासात अडथळा निर्माण करत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही भाजप वारंवर करत आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एक ट्विट प्रसारित केलं आहे.

आज प्रविण दरेकर यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणा संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक मा. श्री हेमंत नगराळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यातून पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला सरका मधील एक मंत्री जबाबदार असल्याची शंका उपस्थित होत आहे. ही गंभीर बाब लक्षात न घेता पुणे पोलिस तपासामध्ये चालढकल करत आहेत, त्याबाबत आपण कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र पोलिस महासंचालकांकडे सुपूर्द केलं आहे.

या पत्रासोबत त्यांनी सामान्य जनतेला पडलेल्या प्रश्नांची यादी दिली आहे. प्रविण दरेकरांनी विचारलेले प्रश्न खालीलप्रमाणे:-

1.पूजा चव्हाण यांच्या मृत्यूची घटना घडल्यापासून प्रमुख साक्षीदार अरुण राठोड कुठं आहे? त्याचा तपास पोलीस लावू शकले नाहीत, कारण काय? काय प्रयत्न केले?

2. त्याच्या जीवाचं बरं वाईट झाले आहे का?, अशी भीती जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, पोलीस महासंचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबत माहिती का देत नाहीत?

3. त्याच्या कुटुंबाचा देखील ठाव ठिकाणा नाही, जनतेला त्याच्या कुटुंबाची देखील काळजी वाटतं आहे, त्याच्या कुटुंबाविषयी सरकार काही माहिती देऊ शकेलं का?

4. घटना घडून आणि ऑडिओ क्लिप उघड होऊन अनेक दिवस झाले आहेत, पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न झालं किंवा तपासाची प्रगती काय आहे?, याबद्दल महासंचालक जनतेला काही माहिती देऊ शकतील काय?

5. मृत पूजा चव्हाण यांचे कुटुंबिय देखील असुरक्षित आहेत. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम असा जयघोष करणारे सरकार त्यांना सुरक्षा प्रदान करणार का?

6. अरुण राठोड व एक महिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाले होते, त्या महिलेच्या नावाची नोंद पूजा चव्हाण या नावाशी मिळतीजुळती असून, याचा पोलीस तपासात फायदा होणार आहे. पोलिसांनी याबाबत चौकशी केली आहे का?

7. ऑडिओ क्लिपमध्ये ज्यांचा आवाज आहे, ज्यांच्याबद्दल पूजाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे, त्या संबंधित मंत्र्यांची चौकशी तातडीने करणं गरजेचं असताना पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केलं गेलं?

8. स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी कोरोना प्रसार वाढू नये, यासाठी राज्यात यात्रा, सभा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली, जनसामान्य त्याचे पालन करत आहेत, जर कोरोना विषयक खबरदारी पाळली नाही तट लॉकडाऊन करू अशी धमकी मुख्यमंत्री जनतेला देत आहेत? साधा मास्क नसेल, तर मुख्यमंत्री सामान्यांकडून 2000 रुपयांचा दंड वसूल करतात, अशा परिस्थितीत 15 दिवस लपून बसलेला मंत्रिमंडळातील एक सदस्य मंत्री स्वतःचे पाप लपवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करतो, लाखोंचा जमाव जमवतो, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतो, त्यांना मुख्यमंत्री कोणता दंड लावणार आहेत?

9. मंत्रालयातील सहाव्या मजल्याच्या दबावामुळे पोलीस तपास प्रभावित झाला आहे का?

10. घटना घडल्यानंतर अरूण राठोडच्या घरात चोरी झाली, याचा तपास पोलिसांनी केला आहे का? असल्यास काय निष्पन्न झालं?

11. संशयित मंत्र्यांपर्यंत 15 दिवस पोलिसांना पोहोचू न दिल्यामुळे त्यांनी पुरावे नष्ट केले का?

12. मंत्रिमंडळातील मंत्री 15 दिवस गायब होते, ते कुठे आहेत? का लपले आहेत? याची चौकशी मुख्यमंत्री म्हणून आपण केली का? असेल तर त्याची माहिती आपण जनतेला देणार आहात का?

13. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक माध्यमांना का टाळत आहेत? जनतेला हवी असलेली माहिती का देत नाहीत?

14. पूजा चव्हाण यांच्या प्रकरणात आवाज उठवल्यामुळे भाजप नेत्या चित्रा ताई वाघ यांना धमकावण्याचा प्रयत्न का केला जातोय? विरोधी पक्ष नेता म्हणून मला आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय किंवा पोलीस महासंचालक या प्रश्नांची उत्तरं देतील का?

दरम्यान, या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर शेधून पूजा चव्हाणच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे.

विधान परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून,
पूजा चव्हाण यांच्या आत्म’हत्या’ प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना माझे काही प्रश्न आहेत…
मविआ सरकारकडून जनतेसह सर्वांनाचं या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत.@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @OfficeofUT pic.twitter.com/Gx8EvHftJW

— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 24, 2021

थोडक्यात बातम्या-

शेतकरी तसेच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ऊर्जामंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

खेळासाठी कायपण… म्हणून ‘हा’ क्रिकेटपटू म्हणाला विमान नको, मी कारनेच जाणार!

“मी त्यांना वाघ म्हणणार नाही, संत म्हणतो… संत संजय राठोड लगे रहो!”

मजबुरी का नाम उद्धव ठाकरे!; “मंत्र्याची हकालपट्टी करण्यापासून कोण रोखत आहे?”

“मी ठरवेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण, या अहंकारात मंत्रिमंडळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More