मुंबई | मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण दरेकरांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असून तोपर्यंत दरेकरांवर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत.
माझ्यावरचं हे संकट महाविकास आघाडी निर्मित आहे, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या कारवाईला मी संकट मानत नाही. न्याय व्यवस्था सत्याच्या बाजूने उभी असते, असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. तर महाविकास आघाडीला नापास विद्यार्थी म्हणत दरेकरांनी पुन्हा एकदा सरकारला डिवचलं आहे.
तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, असा खोचक टोला दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. राज्य आज वाऱ्यावर पडलं आहे. राज्याला सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि तो पर्याय फक्त भाजप (BJP) आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं आहे.
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) पक्ष वाढवण्याचं काम करू शकतात. मात्र, आगामी निवडणुकीत सत्ता भाजपचीच येईल. गेल्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप-सेनेचं सरकारचं आलंच होतं पण स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी हे तिन्ही वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सोबत आले, अशी टीका देखील प्रवीण दरेकरांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रनौतला न्यायालयाचा दणका
38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या ऑफर
“पावसात भिजून देखील राष्ट्रवादीचे 54 आमदारच निवडून आले”
‘सर्व प्रियजनांना आणि नॉटी जनांना…’; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
Comments are closed.